‘हे’ 15 कायदेशीर अधिकार जे प्रत्येक भारतीयाला माहिती असणं अत्यंत आवश्यक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत एक लोकशाही देश आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला काही संविधानिक अधिकार आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकाराविषयी माहिती असणे गरजेचे आहे. शिक्षा आणि जागरुकतेच्या अभावामध्ये अनेक नागरिकांना आपले संविधानिक अधिकार माहित नसतात. ज्यामध्ये त्यांना त्रास, भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया या अधिकारांविषयी…
1. तुम्हाला एल.पी.जी. गॅस कनेक्शनसोबत 40 लाख रुपयांचा विमा मिळतो. जर तुमच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर तुम्हाला 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.
2. जर तुम्ही कंपनीने दिलेल्या भेटवस्तूचा स्विकार करत असाल तर कोणतीही व्यक्ती तुमच्यावर लाच घेण्याचा आरोप लावू शकते. आजकाल कंपनीमध्ये लोकांना भेटवस्तू देण्याची परंपरा असते. सरकारद्वारे ही परंपरा बंद करण्यासाठी वर्ष 2010 मध्ये एक कायदा बनवला गेला आहे आणि या कायद्यानुसार जर तुम्ही कंपनीकडून भेटवस्तूचा स्विकार करत असाल तर त्याला लाच म्हणून संबोधले जाईल आणि तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
3. भारतात महिला पोलीस अधिकाऱ्यांनाच महिलांना अटक करण्याचा अधिकार आहे. जर भारतात कोणत्याही महिलेला पुरुष पोलीस अधिकाऱ्याने अटक केली तर तो गुन्हा मानला जातो. त्याचबरोबर असे केल्यास त्या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई देखील होऊ शकते. जर कोणत्याही महिलेला रात्री 6 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात यायला सांगितले गेले तर त्या महिलेला पोलीस ठाण्यात येण्यासाठी नकार देण्याचा पुर्ण अधिकार आहे.
4. इनकम टॅक्स अधिकाऱ्याकडे तुम्हाला अटक करण्याचा अधिकार असतो. जर तुम्ही टॅक्स दिला नसेल तर टी.आर.ओ. (टॅक्स रिकव्हरी ऑर्गनायजेशन) कडे तुम्हाला अटक करण्याचा अधिकार असतो. त्यांच्या परवानगीनेच तुम्ही कारागृहातून बाहेर येऊ शकता. या नियमांचा उल्लेख 1961 च्या इनकम टॅक्स कायद्यामध्ये केला गेला आहे.
5. सायकल चालवणाऱ्यांवर कोणताच मोटर व्हेईकल अॅक्ट लागू होत नाही. जर तुम्ही रोज सायकल चालवत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये सायकल आणि रिक्षा येत नाही.
6. महिला पोलिसांकडे ई-मेलच्या माध्यमातून तक्रार करु शकतात. त्यांना पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. भारतात अजूनही असे लोक आहेत जे लिव्ह-इन-रिलेशनशिपला कायदेशीर गुन्हा मानतात. भारतीय कायद्यानुसार लिव्ह-इन-रिलेशनशिप अवैध नाही. पण यामध्ये राहणाऱ्या पुरुष आणि महिलांनी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्यावेळी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये कपलला मुल झाले तर त्याच्या आई-वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पुर्ण अधिकार असतो.
7. राजकीय पक्षांकडे निवडणुकीच्या वेळी वाहन भाड्याने घेण्याचा अधिकार असतो. जर तुम्ही वाहन देण्यासाठी तयार असाल तर तुम्ही निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष तुमच्याकडून वाहन भाड्याने घेऊ शकतात.
8. भारतात जर तुम्ही ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला एका दिवसात फक्त एक वेळा दंड भरावा लागतो. पुर्ण दिवस तुम्हाला दंड भरावा लागत नाही. उदा. जर तुमच्यावर हेल्मेट न घातल्यामुळे दंड लागला तर दिवसभर तुम्ही विना हेल्मेट फिरु शकता.
9. तुमच्याकडे वस्तुची किंमत कमी करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दुकानदाराकडून वस्तु कमी किंमतीत घेऊ शकता. उदा. एखादी वस्तु 100 रुपयाला असेल तर ती तुम्ही 90 ला घेऊ शकता.
10. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून उधार पैसे घेऊन ती परत करत नसेल तर कोर्टात त्या व्यक्तीविरोधात तुम्ही तक्रार दाखल करु शकता.
11. जर तुम्ही सार्वजनिक जागेवर अश्लिल कृत्य करत असाल तर तुम्हाला 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते.
12. पोलिस हेड-कॉस्टेंबल कोणत्याही अशा गुन्ह्यासाठी तुम्हाला दंड बजावू शकत नाही ज्या गुन्ह्यासाठी दंड 100 रुपयापेक्षा अधिक असेल. जर तुम्ही एकापेक्षा अधिक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला दंड लागू शकतो.
13. 1861 मध्ये बनलेल्या पोलीस अॅक्टनुसार भारतातील प्रत्येक राज्यातला पोलीस अधिकारी नेहमी ड्यूटीवर असेल. जर मध्यरात्री कोणतीही घटना घडली तर पोलिसांना तेथे हजर रहावे लागते. पोलीस अॅक्टनुसार पोलीस कर्मचारी वर्दीशिवायही आपल्या ड्यूटीवर राहतात.
14. 1956 मध्ये बनलेल्या हिंदू दत्तक कायद्याच्या अनुसार जर तुम्ही हिंदू धर्माचे आहात आणि तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसरे मुल दत्तक घेऊ शकत नाही. जर तुम्हाला मुल नसेल तरच तुम्ही मुल दत्तक घेऊ शकता. तुमच्या आणि बाळाच्या वयामध्ये 21 वर्षाचे अंतर असले पाहिजे.
15. जर पती-पत्नीयांचे लैंगिक संबंध चांगले नसतील तर दोघे हे कारण सांगून घटस्फोट घेऊ शकतात.
Comments are closed.