पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. तसेच एका थालीमध्ये दोन विध्यार्थाना जेवता येत नाही.असा अजब नियम विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर लादला असताना या विरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्टरीसमोर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते.दोन दिवसानंतर या सर्वांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
भोजनालयाचे नवीन नियम हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणारे आहेत. त्यामुळे हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलीस तक्रार केली.आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहिती ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांना हंगामी अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला. विद्यार्थ्यांतर्फे ऍड. ठोंबरे. ऍड. हितेश सोनार. ऍड. नीलेश वाघमोरे यांनी काम पाहिले.