भंडारा: बहुजननामा ऑनलाईन – पवनी तालुक्यातील ( सिंदपुरी ) येथे महासमाधीभूमी महास्तूपाचा ११ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला देश-विदेशातील भन्ते आणि हजारो भाविकांनी हजेरी लावली. यावेळी संपूर्ण परिसर हा बुद्धमय झाला होता. पन्ना-मेत्ता पत्ता संघ हा महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर तसेच तामिळनाडू व नेपाळ येथे शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्य करत आहे.त्याचा एक भाग म्हणून पवनी तालुक्यातील सिंधू पुरी येथे २००७ मध्ये महासमाधी भूमी महास्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. करण्यात आला असून १५ फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व देंग्योदईशी साईच्यो यांची प्रत्येकी ६ फूट उंचीची ग्रॅनाइटची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रा असलेल्या मुर्त्या धम्माची शिकवण देताना, खीर घेताना लोकांच्या आकर्षणाचा विषय बनल्या होत्या. स्थापना दिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच येथे भाविकांची गर्दी जमली होती. हजारो भाविक या महास्तुपात बुद्धाच्या आणि आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. त्यामुळे संपूर्ण परिसर धम्ममय होतो. या कार्यक्रमास देश विदेशातील भन्ते हजेरी लावतात. सकाळी निलेश फाट्यावर बौद्ध भन्ते भिक्खूंचे स्वागत करून संपूर्ण पवनी शहरात धम्मा रॅली काढली जाते. त्यानंतर ही रॅली महास्तूपा येथे आल्यावर भारतीय जपानी तिबेट पद्धतीने बुद्ध पूजा पाठ करण्यात आली. पन्ना-मेत्ता संघाचे कार्य हे देश-विदेशातील अनेक राज्यात सुरू आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष संघरत्न मानके यांनी सांगितले.