बहुजननामा ऑनलाइन टीम : बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या ११८ वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडे यांच्या बीडमधील बंगल्यावर येऊन भेट घेतली. महत्वाचे म्हणजे ते खास त्यांना भेटण्यासाठी आष्टीहून मुंबईला आले होते. ११८ वर्षीय दादाराव यांच्या भेटीने खूप भारावून गेल्याचे धनंजय यांनी सांगितले आहे. एव्हरग्रीन दादांना पाहून या वयातील त्यांची उर्जा पाहून मलाही काम करण्यास स्फुरण चढल्याचे मुंडेनी म्हटले आहे. मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊँटवरुन त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्याचा फोटो शेअर केला आहे.
वय वर्षं ११८ असलेले हे आमच्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील साहेबराव थोरवे दादा. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी. आजही कशाचाही आधार न घेता फिरतात, पेपर, पुस्तकेही वाचतात. असे एव्हरग्रीन दादा माझे कौतुक करण्यासाठी आले होते. या वयात दादांची ऊर्जा पाहून मलाही काम करायला अजून स्फुरण चढले! pic.twitter.com/EuPXROYVzY
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2019
परळी मतदार संघातून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून विजय संपन्न केलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांची तरुणांपासून ते वयोवृद्ध अशा सर्वच वयाच्या गटामध्ये फॅनफॉलोविंग आहे. धनंजय मुंडे यांची भाषण करण्याची शैली आणि जनमानसातील संपर्क यामुळेच परळीकरांनी यावेळी त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव करणारे नेते धनंजय मुंडेंना सध्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा येत आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाची क्रेझ जशी तरुणांमध्ये आहे, तशीच त्यांच्या नेतृत्वाची आवड वयोवृद्धांनाही आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत पाऊल टाकले.
नाशिकचे विजय मस्के, ते स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. नाशिकला अपंग बांधवासाठी ते काम करतात. माझ्या विजयासाठी त्यांनी त्यांच्या ग्रामदेवतेला साकडे घातले होते.नाशिकवरून येऊन त्यांनी आज मुंबईत माझी भेट घेतली.आनंद वाटला.माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे हे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे. pic.twitter.com/cyy50KrckS
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2019
नाशिकमधील अपंग बांधवाने, जो कॉम्प्यूटर इंजिनअर आहे. त्यानेही धनंजय मुंडेंच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे घातले होते. नाशिकवरुन येऊन विजय मस्केंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. विजयसारखे कार्यकर्ते हीच माझी उर्जा असल्याचे सांगत धनंजय यांनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.
Visit : bahujannama.com