मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी भाजपसोबत युती करावी अशी थेट मागणीच पत्रातून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सेना- भाजप ( Shiv Sena – BJP) युतीची चर्चा रंगली आहे. असे असतानाच दुसरीकडे आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला उघड आव्हानच दिले आहे. विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील (hinganghat nagar parishad) भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. 10 bjp corporators of hinganghat nagar parishad will join shiv sena
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक
आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपला मोठा दणका दिला होता.
जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते.
त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Web Titel : 10 bjp corporators of hinganghat nagar parishad will join shiv sena
Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा
Pune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न