बीड : बहुजननामा ऑनलाइन – वडवणी तालुक्यातील कु स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बंधावच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील रहिवासी व सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. स्वाती राठोड हिने रोडरोमिओंच्या छेडछाणीला कंटाळून २२ जानेवारी रोजी स्वत: औषध प्राशनकरून आपली जीवनयात्रा संपवली. या विद्यार्थ्यांनीने या गुंड प्रवृत्तीच्या मुलांबद्दल शाळेतील प्रशासन आणि पोलिस स्टेशन यांना तोंडी व लेखी सूचना देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. उलट त्रास देण्याचा प्रकार वाढत गेला, आपले आईवडील कारखान्याला कर्नाटकात गेले आहेत आपल्याला कोणीच मदत करत नाही, आपण एकट्या आहोत अशा भावनेने स्वातीने विषारी औषध घेतले यातच तिचा मृत्यू झाला.स्वातीच्या मृत्यूला जबाबदार सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी तालखेड फाटा येथे जीवन राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन राठोड व जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.
या वेळी बोलताना जीवन राठोड यांनी सांगितले की, उद्या बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद राहील तसेच वडवणी येथे रास्ता रोको आणि वडवणी बंद करण्यात येईल. या आंदोलनात राष्टीय बंजारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, तालुका अध्यक्ष आबासाहेब राठोड, लालखेड चे उपसर्पणच विनायक चव्हान , विजय राठोड, आबासाहेब राठोड, मानवी हक्क अभियानाचे जिल्हा अध्यक्ष राजेश घोडे, पाझर देशमुख, गोर सेनेचे तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, लहू पवार, पावन राठोड, अतुल राठोड, राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, अविनाश राठोड, कृष्णा पवारसह मोठ्या प्रमाणत बंजारा समाज बांधव उपस्थित होते.