सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनुसूचित जातीतील युवा उद्योजकांना महात्मा फुले महामंडळाकडून एक लाखाचे थेट कर्ज देणार असल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली. नुकतेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या जिल्हा कायकारिणीची बैठक झाली.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सरवदे बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमनाथ भोसले होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरवदे यांनी केले. यावेळी दक्षिण सोलापूर अध्यक्ष ॲड. सिध्दार्थ बनसोडे, सुनिल सर्वगोड, के.डी. कांबळे, सोमनाथ भोसले, जितेंद्र बनसोडे, सतीश शिंदे, प्रकाश बनसोडे, चंद्रकांत वाघमारे, बाबा माने, डी.एन. गायकवाड, अरूण भालेराव, सिद्धेश्वर पाडगळे, रवी सरवदे, अतुल नागटिळक, उमेश वाघमारे, कुमार वाघमारे, बाळासाहेब कसबे, हणमंत कसबे आदी उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे अध्यक्ष ही यावेळी उपस्थित होते.सरवदे पुढे म्हणाले की, महामंडळाकडून नव उद्योजकांना थेट एक लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.
समाजातील होतकरू व उद्योगशील तरुणांनी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. बँक राखीव प्रवर्गातील बेरोजगारांना कर्ज देण्याबाबत सकारात्मक नाही. म्हणूनच महामंडळाने थेट कर्ज योजना सुरू केला आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायााकडे वळावे. सूत्रसंचालन जितेंद्र बनसोडे यांनी तर बसलिंग कांबळे यांनी आभार मानले.