पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लवकरच ८० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या मेंढपाळांसाठी उतरविण्यात येणार असून त्याचा लाभ प्रत्येक मेंढपाळाला दिला जाणार असल्याचे वक्तव्य पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे अंतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे मेष व लोकर सुधार योजने अंतर्गत मेंढपाळ कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते राज्य योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या शेंळ्या-मेंढ्याचे आधुनिक शेडचे उद्घाटन व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेळ्या-मेंढ्यासाठी शेड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र राज्यात मेंढ्या तसेच शेळी पालन यावर आपली उपजिविका भागविण्याऱ्या मेंढपाळाची संख्या मोठी आहे. त्यामुळे लवकरच ८० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या मेंढपाळांसाठी उतरविण्यात येणार असून त्याचा लाभ प्रत्येक मेंढपाळाला दिला जाणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, बंदीस्त शेळी पालनासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांची राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मेंढपाळ तसेच धनगर समाजातील बांधवांनी लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी. सर्व मेंढ्या-शेळ्यांचे संपूर्ण लसिकरण करून त्यांना आजारापासून दूर ठेवा त्यासोबतच आपल्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गोडी लावावी असे आवाहनही त्यांनी केले.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मेंढ्याच्या लोकरापासून तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील मेंढपाळासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबरोबरच मोठया प्रमाणात शेडची उभारणी करण्यात येत आहे, राज्यातील तिन्ही महामंडळे हे फायद्यात असून शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सुचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर अधिकारी तसेच कर्मचारी यांचे काम उत्कृष्ट असल्याने त्यांनी समाधानही व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या मेंढपाळ तसेच शेतकऱ्यांना शेळी-मेंढ्यासाठीच्या जंतनाशक औषधीचे वाटप करण्यात आले.