इंदापुर : बहुजननामा ऑनलाईन-इंदापूर येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज दि. १८ नोहेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता इंदापूर पोलिस स्टेशन येथे विविध मागण्यांसाठी मोर्चाद्वारे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी ३२ कार्यकर्त्यांना इंदापूर पोलीसांकडून कलम ६८,६९ प्रमाणे ताब्यात घेवुन त्यांना ताकीद देवुन सोडून देण्यात आले.
तत्पुर्वी इंदापूर नगरपरिषद मैदान येथिल छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळ्यास बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने पुष्प हार अर्पन करण्यात आला. त्यांनतर सर्व कार्यकर्त्यांसह इंदापुर नगरपरिषदेपासुन मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा बाबा चौक मार्गे इंदापुर पोलीस्टेशन या ठीकाणी गेला. यावेळी इंदापूर पोलीसांनी मोर्चेकर्यांना ताब्यात घेतले. यामध्ये अँड राहुल मखरे, बाबासाहेब भोंग, संजय शिंदे, आझाद सय्यद, नानासाहेब चव्हाण, सूनिल कांबळे, संतोष कांबळे, संजय कांबळे, सचिन देशमाने, गणेश चंदनशिवे, रूपाली शिंदे, मनिषा मखरे, मोनाली धाइंजे यांचेसह संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांना कलम ६८,६९ प्रमाणे ताकीद देवुन सोडून देण्यात आले.
यावेळी इंदापूर पोलिसांना मोर्चाच्या वतीने विवीध मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की गुजरात राज्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परिवर्तन यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रेचा समारोप व जाहीर सभा कार्यक्रम दि.२२ आॅक्टोंबर रोजी अहमदाबाद येथे बहुजन मूक्ती मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला होता. परंतु गुजरात सरकारने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातुन राजकीय दबाव टाकुन संविधानातील कलम १९ चे उल्लंघन करून सदर कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे संविधानिक अधीकारांना वाचविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशभरात ३१ राज्यातील ५५० जिल्ह्यात, आणी ४ हजार तालुक्यामध्ये राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलने तीन टप्यात होत असुन त्यामध्ये विविध मागण्यांचाही समावेश आहे. याचाच भाग म्हणून इंदापूर येथे आज बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आल्याची माहीती बाबासाहेब भोंग यांनी दिली.