लखनऊ : वृत्तसंस्था –आज ( ११ जानेवारी ) लखनऊमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत दोघांची आघाडी होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून दरम्यान उत्तर प्रदेशमधील दोन नेते समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत दोघांची आघाडी होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. इतकेच नव्हे तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा समावेश नाही आहे. त्यावरुन स्पष्ट समजते की आगामी लोकसभा निवडणुकत काँग्रेसला सोबत घेण्यास बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी इच्छुक नाहीत.
विशेष म्हणजे, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागा वाटपासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष 37-37 अशा जागा लढवतील. यामध्ये अमेठी आणि रायबरेली या जागांवर दोन्ही पक्ष आपला उमेदवार उतरवणार नसल्याचे समजते. कारण, अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातून जागांवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत.
विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी याआधी महाआघाडीवर दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. विशेष म्हणजे तब्बल एक तास ही बैठक झाली असून दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशात प्रस्तावित महाआघाडी अस्तित्वात आल्यास समाजवादी पक्ष ३५, तर बसप ३६ जागांवर निवडणूक लढवू शकतो. तसेच अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलाच्या वाट्याला ३ जागा, उर्वरित ४ जागा राखीव ठेवणार असल्याचे वृत्त आले होते.