राज्यात ३० जागांवर लोकसभा लढवणार !
अकोला : बहुजननमा ऑनलाइन
स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. इतकेच नव्हे तर समविचारी पक्ष आमच्या संपर्कात आहेत असे अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
अकोला येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती दरम्यान अकोला-बुलडाणा मतदारसंघांसह संभाजी ब्रिगेड राज्यात ३० लोकसभा तर विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०० जागा लढणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले आहे. याचबरोबर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकेच नव्हे तर मात्र युतीसंदर्भातील सर्व निर्णय प्रदेश पदाधिकारी घेणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बाराशे वक्त्यांची फौज निवडणुकीत प्रचार करणार आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या ‘आरएसएस’ प्रचारकांना शह देण्यासाठी आता ‘एमएसएस’ (मराठा सेवा संघ) कार्यरत आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही तीन लाख मते मिळविली आहेत. इतकेच नव्हे तर जनतेचा प्रतिसाद बघता आता मतांची संख्या वाढणार आहे. असा आम्हाला विश्वास आहे. आतापर्यंत आम्ही आंदोलने केली आता थेट सत्ता मिळविण्यासाठी निवडणूक लढविणार आहोत असेही त्यांनी म्हंटले.
यावेळी, विभागीय अध्यक्ष पंकज जायले, जिल्हाध्यक्ष गोपीअण्णा चाकर, अभिजित मोरे, महानगराध्यक्ष पवन महल्ले व प्रा. संदीप निर्मळ आदी उपस्थित होते.