नगर : बहुजननामा ऑनलाइन – प्रकाश आंबेडकरांचे संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचा गंभीर स्वरुपाचा आरोप सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
दिलीप कांबळे म्हणाले की, ‘चुकीची माहिती देऊन समाज्यात फूट पाडण्याचं काम प्रकाश आंबेडकर करत आहेत. या आंबेडकरांचे नक्षवाद्यांशी संबंध आहे हे आता जगजाहीर झाले आहे.’ तसेच भीमा-कोरेगावच्या कार्यक्रमावरून आंबेडकरांचा खरपूस समाचार घेऊन त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना अभिवादन करता येणार आहे. मात्र चुकीच्या माध्यमातून कोणी काय करत असेल तर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कांबळेंनी दिला आहे.
इंदूमीलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना काही करता आले नाही, त्याचं दुःख त्यांना आहे. मात्र त्या ठिकाणी काम चालू असून हे त्यांनी डोळे उघडून बघावं असा ही सल्ला त्यांनी दिला.