काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अंबरनाथ मधिल एक कार्यक्रम संपवून स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांच्या दिशेने एक तरूण धावत गेला आणि त्यांने रामदास आठवलेंना धक्काबुक्की केली. दरम्यान धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र रामदास आठवले यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ परभणी रिपाई तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे या आंदोलनावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणारा प्रवीण गोसावीचा बोलवता धनी कोण ? याबाबत चौकशी करावी, इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांना झेड सुरक्षा द्या अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी, राज्य संघटक डी. एन. दाभाडे, राज्य सचिव, लक्ष्मणराव बनसोडे, राणूबाई वयवळ, अशोक घोबाळे, लोखंडे, मनोहर सावंत, यशपाल कदम, नवनाथ मुजमुले, छबुराव धापसे, बाळासाहेब गायकवाड, भगवान कांबळे, राहुल शिवभगत, आंबादास वाकळे, भाऊराव सावणे, अशोक धबाले, डी.एन.झोडपे आदी उपस्थित होते.