मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे जाहीर केले होते, याच बरोबर धनगर समाजाला अनुसूचित जातीतुन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरही धनगर समाज मात्र आरक्षणापासून वंचित आहे. या प्रश्नावर धनगर नेत्यांना मंत्रीपद देऊन सरकारने गुंडाळले आहे. इतकेच नव्हे तर यात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे, आणि राम शिंदे, यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांनी १० दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेली शिवसेनेने दिला आहे.