वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भारतीय जनता पार्टीच्या आघाडीमध्ये आले तर त्यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत, राहुल गांधींना शरद पवार पाठिंबा देणार नाही तर शरद पवारांना राहुल गांधी पाठिंबा देणार नाही. पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे अनेक उमेदवार आहेत तर भाजपाकडे एकच मोदी आहेत. जर का शरद पवार भाजपा आघाडीमध्ये आले तर पवार यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते. मी स्वतः त्यांना उपपंतप्रधान पद मिळावे म्हणून प्रयत्न करील असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर विरोधी पक्ष नेहमी भाजपा सरकारमुळे संविधान धोक्यात येत असल्याचा गवगवा करत असतो. पण संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्ही सक्षम आहोत असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर यांनी स्वतः आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे जरी स्पष्ट केले असले तरीही राजकीय वर्तुळात अजूनही शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.