बीड : बहुजननामा ऑनलाइन – युवकांनी राजमाता जिजाऊ व छत्रपतींचा इतिहास वाचून आणि प्रेरणा घेवून संकटाला मात करत जग जिंकावे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रविण गायकवाड यांनी केले. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बीड तालुक्यातील जिजाऊ गड (वानगाव फाटा) येथे हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला,यावेळी ते बोलत होते.
ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, नाना महाराज कदम, लोंढे महाराज, सुरेश जाधव महाराज यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना प्रविण गायकवाड म्हणाले, छत्रपतीचा इतिहास हा क्रांतीची प्रेरणा देणारा आहे. तीच प्रेरणा इथल्या प्रत्येक युवकाने घेवून जग जिंकण्यासाठी संकल्प करावा, विचारांचा जागर करत जगा सोबत बदल घडविला तर यशस्वी होवू, असेही ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण, दिगांबर जाधव, पी.वाय जोगदंड, हरिदास जोगदंड, भगवान कोकाटे, गजाबा राजपुरे, यांच्या सह सर्व पंचक्रोशीतील व बीड जिल्ह्यातील सर्व जिजाऊप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद चव्हाण यांनी केले व सूत्रसंचलन संतोष डोंगरे यांनी केले.