इस्लामपूर : बहुजननामा ऑनलाइन-आरपीआयचे राज्य सरचिटणीस अरूण कांबळे यांचा पुतण्या आणि गेल्या 8 दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या इस्लामापूरमधील साकेत कांबळे याचा घातपात झाला आहे. साकेतच्या खूनप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे सर्वबाजुने चौकशी असुन त्याने साकेतचा खून केल्याची कबुली दिली आहे. यामुळे इस्लामपूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्याने नेमका कोणत्या कारणावरून साकेत याचा खून केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 8 दिवसांपासुन साकेत बेपत्ता झाला होता. पोलिस आणि साकेतचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. आज (शनिवारी) साकेतचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साकेतचा खून केल्याचे सांगितले. मृतदेहाचे तुकडे करून ते वारणा नदीत टाकल्याचे संशयित सांगत आहे.
याप्रकरणामुळे इस्लामपूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांना अद्यापही मृतदेह सापडलेला नाही. जीव रक्षक दलाचे जवान चिकुर्डेपासुन वारणा नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. खून प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम चालु आहे. साकेत हा आरपीआयचे राज्य सरचिटणीस अरूण कांबळे यांचा पुतण्या आहे. संशयिताने साकेतचा घातपात का केला आणि कोणत्या कारणामुळे केला याबाबत पोलिस तपास करीत आहेत.