बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेत कुणबी समाजाचाही समावेश करावा व कुणबी समाजाला या महामंडळाच्या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत यापूर्वी कुणबी समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटप करण्यात येत होते. परंतु परंतु नुकताच महाराष्ट्र शासनाने नुकताच अध्यादेश काढुन कुणबी समाजाला यातून वगळले आहे. वास्तविक मराठा व कुणबी समाज एकच आहे.
या योजनेतून कणबी समाजाला वगळल्यास कुणबी समाजातील सुरशिक्षत तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होणार ओ. विदर्भात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज असल्याने यापूर्वी कुणबी समाजाला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील योजनांचा लाभ मिळत होता. परंतु आता शासनाच्या या जाचक अटीमुळे कुणबी समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील कर्ज योजनेत कुणबी समाजाला समवेश करावा, अशी मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात तहसिलदारांमार्फ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कपिल खेडेकर, प्रशांत ढोरे, विनायक सरनाईक, दत्ता सुसर, दीपक सुरडकर, शैलेश अंभोरे, दुष्यंत गायकवाड, बंटी लोखंडे, गणेश धुंदले, बंडू नेमाने, राजू कुटे, शंकर देशमुख, भगवान देशमुख, शैलेश डोंगरदिवे, विलास तायडे, रवी तळेकर, पिंटू वाहेकर, रवींद्र पवार, समाधान जाधव, प्रशांत गायकवाड, शिवाजी पवार, शिवाजी भगत, प्रकाश पंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.