झिम्बॉब्वे : वृत्तसंस्था – झिम्बॉब्वेचे माजी राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचं सिंगापूरच्या रुग्णलयात निधन झालं. 95 वर्षीय मुगाबे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. रॉबर्ट मुगाबे 1980 ते 1987 पर्यंत पतंप्रधान तर 1987 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती होते. त्यांच्या 37 वर्षांच्या कार्यकाळात झिम्बॉब्वेने सर्वात वाईट काळ अनुभवला. गेल्या वर्षापर्यंत तेथे 24 तासात खाण्यापिण्याच्या वस्तूंसहित अनेक मूलभूत गोष्टींची किंमत डबल झाली होती. या देशातील लोक बॅगेत नोटा भरून दूध, भाजी खरेदी करण्यासाठी जात असत. जर पूर्ण घराची शॉपिग करायची असेल तर ट्रॉलित पैसे भरून न्यावे लागत असे.
जाणून घेऊयात झिम्बॉब्वेमधील महागाईबाबत…
लोक ट्रॉलीत नोटा भरून खरेदीसाठी जात असत
काही काळापूर्वी झिम्बॉब्वेच्या रस्त्यावर ट्रॉलीत नोटा भरून उभे असणारे लोक अनेकदा दिसले आहेत. येथे महागाई खूपच वाढली आहे. त्यामुळे लोकांना किरकोळ वस्तूंसाठीही खूप पैसे मोजावे लागत होते. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, झिम्बॉब्वेमधील हा इतिहासातील दुसरा सर्वाधिक महागाईचा दर होता. प्रत्येक 24 तासात महागाईचा दर डबल होत होता.
अर्थतज्ज्ञ सांगतात की, झिम्बॉम्बे सरकारकडे चांगल्या पॉलिसी कमी होत्या. त्यावेळी सरकारने कोणत्याही प्लॅनिंगशिवाय फक्त नोटा छापायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांकडे खूप पैसे यायला सुरुवात झाली. लोकांकडे पैसे तर आले परंतु जीवनावश्यक वस्तू कमी असल्याने महागाई वाढली.
गरीबही बनले करोडपती
झिम्बॉब्वेमध्ये ज्या लोकांना गरीब म्हटलं जात होतं त्या लोकांकडेही कोट्यावधी रुपये असायचे. परंतु याचा काहीच फायदा नव्हता. कारण त्या पैशांची व्हॅल्यू खूपच कमी होती. तेव्हाची आकडेवारी पाहिली तर एक हजार लाख कोटी झिम्बॉब्वे डॉलरची किंमत फक्त 5 अमेरिकन डॉलर इतकी होती.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी