कोल्हा बहुजननामा ऑनलाईन – कोल्हा गावातील युवकांनी पाणी प्रश्नावर उभी केलेली चळवळ जिल्हा भर राबविण्यात यावी. कोल्हा गावातील जलसंधारणाच्या कार्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत उभी केली जाईल. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
कोल्हा विकास मंच तर्फे होणाऱ्या जलसंधारणाच्या कामाला भेट व वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जि. प. उपाध्यक्षा व शिक्षण सभापती भावनाताई नखाते, माजी उपमहापौर भगवानरावजी वाघमारे, प्रेरणाताई वरपुडकर, डॉ. कालाणी साहेब, बाळासाहेब देशमुख, बरदाळे पंडित, नायब तहसीलदार वसिम साहेब, कृषी अधिकारी गायकवाड साहेब, उपसरपंच मनोज भिसे, इंजिनियर लक्ष्मणराव तारे, बाळासाहेब फुलारी, आंबादास तूपसमिदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जलसंधारणाच्या कामाला जेसीबी उपलब्ध करून दिली . त्याबद्दल भगवानराव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. गावकरी लोक सहभागातून २५० झाडे व जाळ्या तयार करून हा वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च वृक्षारोपण साठी देण्याचा निर्णय घेतला. नदीच्या पात्राचे रूदीकरण काम करण्यासाठी तीन लाख पन्नास हजार रुपये निधी उभा करून जवळपास तीस लाख रुपये काम केले आहे.
यावेळी कार्यक्रम प्रास्ताविक डाॅ. रामचंद्र भिसे यांनी केले. सूञसंचलन उध्दव भिसे व आभार प्रकाश मोहकरे यांनी केले. यावेळी डॉ. गावकरी उध्दवराव भिसे, गुलाबदादा भिसे, नारायणराव भिसे, राजेभाऊ भिसे, गोपाळराव भिसे, मुंजाजी भिसे, दत्तात्रय भिसे, ज्ञानेश्वर भिसे, तुकाराम भिसे, गोविंद भिसे, धनंजय भिसे, प्रफुल्ल जैन, सुभाष फुलवरे. भास्कर तारे, राजेश मोहकरे, न्यायाधीश सुभाष तारे, मधूकर मोहकरे, सखादादाभिसे, दत्तराव भिसे, वैभव भिसे,श्रीकांतभिसे, मधू भिसे , वैजनाथ भिसे , ग्रामसेवक खरवडे साहेब, तलाठी गोस्वामी, छगन मोरे, नारायणनाना भिसे, भारत तारे, नरेश मंत्री , बाबा भिसे, माधव भिसे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद तारे, रामचंद्र गायकवाड, भानुदास भिसे, राजेद्र देशमुख, सोपान भिसे, कारभारी भिसे, पञकार राम भिसे, गजानन घोडके, रमेश तारे, अजॆन ढाकरगे, शुभम भिसे, भागवत भिसे, दिनेश भिसे, इंदूमती ताई तारे, अर्चनाताई भिसे, मिराताई भिसे, मंगलताई भिसे, कालिदाताई भिसे, सविताताई भिसे , संगिता घोडके, आदी महिला पदाधिकारी उपस्थित कोल्हा विकास मंच. कोल्हा, ता.मानवत जि परभणी जलमिञ प्रतिष्ठान, परभणी, ग्रामपंचायत कोल्हा , प्राथमिक आरोग्य केंद्र, कोल्हा, जिल्हा परिषद शाळा, कोल्हा समस्त गावकरी मंडळी, कोल्हा येथील महिला बचत गट पदाधिकारी कोल्हा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.