नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिटेकच्या मैदानावरच एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा खेळाडू ओडिसा येथील असून सत्यजित प्रधान असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. तो केंद्रपाडा येथील देरावीश महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळलेली नाही.
या युवा खेळाडूच्या मैदानावरच झालेल्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की , मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना अचानक या क्रिकेटपटूला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. त्यानंतर मैदानावरील इतर खेळाडू त्याच्या भोवती जमा झाले. संघाच्या डॉक्टरांनीही त्याच्याकडे धाव घेतली.
डॉक्टरांनी काही प्रथमोपचार करायला सुरुवात केली. पण तो खेळाडू कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच त्या युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पण अजून त्याचे शवविच्छेदनाची प्रकिया करण्यात आलेली नाही.