नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात एका मुलीच्या अपहरणाची घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. भंडारा शहरात राहणारी पीडित मुलगी लाखनी येथे एका कॉलेजमध्ये 12 वीच्या वर्गात शिकत होती. 9 फेब्रुवारी रोजी कॉलेज सुटल्यानंतर ती राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे रस्त्यावर मैत्रीणीसोबत उभी होती. त्यावेळी मैत्रीणीचे मामा आल्यामुळे तिच्यासोबत असलेल्या दोघी निघून गेल्या. नंतर ती एकटीच होती.
त्याचवेळी एक कार तिच्यासमोर येऊन थांबली आणि त्यातून एका व्यक्तीने ‘भंडारा रोडला कसे जायचे’ असे विचारले. पीडितेनं पत्ता सांगितल्यानंतर आपण स्वत: पोलीस असून तुला ही भंडारा सोडून देतो, अशी बतावनी करत गाडीमध्ये बसण्यास सांगितले. पोलिस असल्याने तिला संशय न येता ती कारमध्ये बसली. मात्र काही अंतर पुढे गेल्यानतंर आरोपीने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने प्रतिकार सुरु केला. अखेर तिने हिंमत करुन गाडीचे स्टेरिंग फिरवल्यामुळे गाडी आदळली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला फेकून दिले आणि पळून गेला.
यानंतर पीडितेने लाखनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीसांनी 6 पथके तयार करुन आरोपीचा शोध घेतला. 72 तासात पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. आरोपी पोलिस निघाल्यामुळे पोलीस दलालाही धक्का बसला. आरोपी निलेश हेडाऊ या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीस पुढील तपास करत आहे.