बहुजननामा ऑनलाईन – इस्लामिक देशात महिलांनी काळा अबाया (बुरखा) घालणे हे त्यांच्या पवित्रतेचे लक्षण मानले जाते. मात्र अलीकडे सौदी अरेबियात महिला पांरपरिक अबाया (बुरखा) घालणे थांबवत आहेत. अलीकडेच जेव्हा एक महिला बुरख्याशिवाय रियाद येथील एका मॉलमध्ये गेली तेव्हा लोकांच्या तिरस्कारी नजरेचा सामना तिला करावा लागला. तर काहींनी तिला पोलीसांत तक्रार करण्याची धमकीही दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी शहजादा मोहम्मद बिन सलमानने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, इस्लाममध्ये अबाया असावाचा असा नियम नाही, अबायाचा नियम शिथिल होऊ शकेल. त्यानंतर कोणताही औपचारिक नियम लागू न केल्यामुळे बुरखा घालण्याचा नियम कायम कऱण्यात आला.
मात्र काही महिलांनी सोशल मीडियावर कपड्यांवरील अशा बंदीविरोधात आवाज उठविला आणि अबाया नसलेल्या ड्रेसमध्ये फोटोही शेअर केले. सौदी अरेबियामध्ये ही घटना दुर्मिळ आहे. आता काही स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी चमकदार रंगाचा अबया परिधान करतात. तेथील मशाल-अल-जालुदने एक मोठे पाऊल उचलत आता बुरखा घालणे बंद केले. गेल्या आठवड्यात 33 वर्षीय जालूद मॉलमध्ये ट्राऊझर्स आणि गडद गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये दिसल्या. तेथे उपस्थित जमावातील बरेच लोक त्याच्याकडे होते.
जालूद शिवाय २५ वर्षीय मनहेल-अल ओताबीनेही अबया घालणे सोडले. ती म्हणाली, “मी गेल्या चार महिन्यांपासून रियादमध्ये अबायाशिवाय राहत आहे. मला जसे पाहिजे तसे जगायचे आहे. मला कोणत्याही बंधनाशिवाय मुक्त जगायचे आहे. मला जे नको आहे ते घालण्यास कोणीही सक्ती करु नये.” मात्र कोणत्याही नियमाशिवाय मी सुरक्षित नाही. माझ्या जीवाला धोकाही होऊ शकतो अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
Defiant #Saudi woman Mashael al-Jaloud stunned onlookers on the streets of Riyadh by walking around without wearing the abaya.
“There are no clear laws, no protection. I might be at risk, might be subjected to assault from religious fanatics because I am without an abaya.” pic.twitter.com/6KzlG9g34U
— Kumail Soomro (@kumailsoomro) September 13, 2019
https://twitter.com/EHathloul/status/1172083153550401537