बहुजननामा ऑनलाईन – भिवंडीमध्ये हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर चार नराधामांनी बलात्कार केला आहे. या महिलेवर भिवंडी रेल्वे स्थानकाजवळील एका निर्जन स्थळी आरोपींनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर भिवंडी शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलेवर तिच्या छोट्या दिरानेच बलात्कार केला. आरोपी दिराने आपल्या वहिनीला काही कारण सांगून भिवंडी स्थानकाजवळील एका निर्जन स्थानी नेले. त्या ठिकाणी जाताच त्यांनी वहिनीवर बलात्कार केला. यादरम्यान महिलेने बचावासाठी आरडाओरडा केला असता जवळच्याच झाडीत नशा करत बसलेले तिघे जण तिथे आले. यावेळी महिलेला धमकावून या तिघांनीही महिलेवर बलात्कार केला.
पीडित महिलेने या प्रकरणात कशीबशी स्वतः ची सुटका केली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या दिरासह तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले. यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. १७ सप्टेंबर पर्यंत कोर्टाने या चारही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.