बहुजननामा ऑनलाईन : एका महिलेवर घरात तिच्याच कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ही घटना असून ६७ वर्षीय महिलेला कुन्हाहाउंड्स (Coonhounds )कुत्र्याने जखमी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुत्र्याच्या हल्ल्यानंतर अरलिन रेन्ना नावाची महिला घरात फरशीवर बेशुद्ध पडली. सायंकाळी पती घरी परत आल्यानंतरच तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले . त्याच वेळी, रेन्नाचा आधीचा पती जॉन टेलर यांनी फेसबुकवर या घटनेची माहिती दिली. एका किंवा दोन्ही कुत्र्यांनी त्या महिलेवर हल्ला केला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या घटनेदरम्यान रेन्नाशिवाय इतर कोणीही घरात नव्हते. या घटनेनंतर दोन्ही कुत्र्यांना अॅनिमल शेल्टरमध्ये नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांबाबत न्यायालय निर्णय घेईल. २१ वर्षांपासून रेनाशी विवाहबद्ध असलेल्या तिचा आधीचा पती जॉनने तिचे एक उत्तम स्त्री म्हणून वर्णन केले. तो म्हणाला कि, रेन्नासारख्या महिलेची जागा कोणी घेऊ शकत नाही. ती नेहमी हृदयात राहील.