बहुजननामा ऑनलाईन : एका आजाराने दोन्ही पाय गमावलेल्या ९ वर्षीय मुलीने न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर चालत विक्रम केला आहे. डेझी देमेट्री असे या मुलीचे लाव असून तिच्या आजारामुळे तिचे दोन्ही पाय कापून काढावे लागले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पाय गमावल्यानंतर न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सामील होणारी डेझी हि पहिली मुलगी ठरली. ९ वर्षीय मॉडेल डेझी या महिन्यात पॅरिस फॅशन आठवड्यात देखील भाग घेणार आहे. ती बर्मिंघमची रहिवासी आहे. डेझीने सांगितले की, न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सामील झाल्याचा मला अभिमान आहे.
रविवारी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये डेझीने लुलू ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. डेझी जन्मापासूनच फिब्युलर हेमीमिलिया नावाच्या आजाराने ग्रस्त होती. यामुळे, हाडे विकसित होत नाहीत. त्यामुळे १८ महिन्यांची असताना तिचे दोन्ही पाय कापले गेले.
डेझीची ११ वर्षीय बहीण एलानेही तिला रॅम्पवर पाठिंबा दर्शविला. डेझी वयाच्या ८ व्या वर्षापासून कृत्रिम पायांच्या सहाय्याने मॉडेलिंग करत आहे. नायके आणि बोडेन या ब्रँडसाठीही तिने प्रचार केला आहे. डेझी अद्याप गर्भाशयात असतानाच तिच्या आई-वडिलांना समजले की मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त आहे. डेझीच्या एका पायामध्ये हाड नव्हतं तर दुसऱ्या पायाच्या हाडातही थोडासा विकास होता. शस्त्रक्रियेच्या ८ तासांनंतर तिचे दोन्ही पाय कापण्यात आले.