मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तिच्या ‘सेक्स लाईफ’ मध्ये व्यत्यय आल्यामुळे एका आईने आपल्या दोन मुलींची हत्या केली. या प्रकरणात लुसे पोर्टन नावाच्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण ब्रिटनमधील रग्बी शहरातील आहे. एका वृत्तापात्रने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाकडून सांगण्यात आले होते की, खुनाच्या काही दिवसानंतर ही महिला पैशासाठी सेक्सची ऑफर देत होती. दोषी ठरवल्यानंतर कोर्टाने शुक्रवारी २३ वर्षीय महिलेला शिक्षा सुनावली. मात्र, महिलेने कोर्टात मुलींची खून केल्याचा नकार दिला. गेल्यावर्षी ३ वर्षांची मुलगी लेक्सी ड्रेपर आणि १७ महिन्यांची स्कार्लेट वुगन यांचा १८ दिवसांत मृत्यु झाला. कोर्टाने हा खून विचार करून झाल्याचे सांगितले.
कोर्टाने सांगितले की जिथे आईने आपल्या मुलांची काळजी घ्यावी, तर तिने निर्दोष व्यक्तीची हत्या केली. हत्येनंतर महिलेने फेसबुकवर मुलींचे कपडे विकण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. काळ्या पॉलिथिनमध्ये मुलींचे कपडे ठेवून तिने प्रत्येक पॅकेटसाठी १२७० रुपये मागितले. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, जानेवारी २०१८ मध्ये आईने मोठ्या मुलीची गळा आवळून हत्या केली होती. तर दुसर्या मुलीची १८ दिवसांनी हत्या केली गेली. त्या महिलेला किमान ३२ वर्षे तुरूंगात राहावे लागले.