नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने सांगितले आहे की, तिच्या पतीनं तिला ड्रग्स दिले, जेव्हा तिला जाग आली तेव्हा एक परपुरुष तिच्यावर रेप करत होता. हेही तिच्या पतीसमोरच घडलं आहे. इतकेच नाही तर असे अनेकदा घडलं.
घरगुती हिंसेची शिकार झालेल्या महिलांना मदत करण्यासाठी काम करणारी ऑस्ट्रेलियाची एक संस्था ब्रोकन टू ब्रलियंटने एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. शॅटर्ड टू शायनिंग नावाच्या या पुस्तकात अशा 10 महिलांची कथा प्रकाशित केली आहे ज्यांना हिंसेचा सामना करावा लागला आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शॅटर्ड शायनिंग नावाच्या पुस्तकात मेरी (बदलेलं नाव) म्हणते की, ऑफिसातल्या एकाशी तिची ओळख झाली. ती लगेचच त्याच्याकडे ओढली गेली. कारण त्याचं त्याच्या मुलांवर खूप प्रेम होतं आणि त्याच्यात काहीतरी रहस्यमयसारखं होतं. ते गुपचूप रिलेशनशिपमध्येही आले.
मेरी म्हणाली की, “एका वर्षानंतर मी सेक्स स्लेव्ह बनले होते. माझ्यासोबत होणारं लैंगिक शोषण पाहून पतीला संतुष्टी मिळत होती. माझी खूप वाईट अवस्था झाली होती.” मेरीला फसल्यासारखं वाटत होतं कारण तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. ती नेहमीच पतीला माफ करण्यासाठी कारण शोधत असे. त्याच्यापासून मेरीला एक मुलागाही आहे.
मेरीने जवळपास एक वर्ष या अत्याचाराचा सामना केला. अखेर तिने हिंमत दाखवत पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. मेरीने आपल्या बहिणीला सर्वकाही सांगितले. तिला रहायला घर नव्हतं. तिला त्याच्याच घरी रहावं लागलं. दोन वेळा तिला डिप्रेशनमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. तिने स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला. नंतर कळलं की, ती बायपोलर डिसऑर्डरची शिकार झाली आहे.
मेरी म्हणते की, “लोक मला विचारतात की, तू अशा नात्यात एवढा वेळ का राहिली? आता मी उत्तराच्या रुपात शॅटर्ड टू शायनिंगचा माझा चॅप्टर सुचवू शकते.”