नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हटले जाते. मात्र, कधी कधी अती प्रेमही घातक ठरू शकते. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका माथेफिरू बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड धोका देत असल्याच्या संशयावरून तिला बेदम मारहाण केली. यात ती तरुणी बेशुद्ध पडली. या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. डॅक्लेन असे अटक केलेल्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. या प्रकरणी पेज मिडलहर्स्ट (वय 25) या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत पेज मिडलहर्स्टने म्हणाली की, तिचा बॉयफ्रेंड डॅक्लेन खूप मजेदार आणि रोमँटिक होता. मात्र, तो कायम तिच्यावर संशय घ्यायचा. पेजच्या भावानेही तिला डॅक्लेनपासून सावध राहण्यास सांगितले होते. मात्र, पेजला असे वाटले की ती डॅक्लेनला अधिक चांगल्या प्रकारे ओळखते. डिसेंबर 2018 मध्ये पेज ऑफिसच्या पार्टीला गेली होती. त्यावेळी डॅक्लेनने तिला त्याच्या संपर्कात राहायला सांगितले होते. मात्र, पेजच्या फोनची बॅटरी लो झाली. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे डॅक्लेन खूप रागावला. पेज म्हणाली की, त्याने मला सांगितेल होते की तो मला माझ्या घराजवळ भेटणार होता. मी तिथे पोहोचले तेव्हा त्याने माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि रस्त्यावर ढकलले. मी कशी तरी उठले. त्यानंतर त्याने मला पुन्हा एकदा मारहाण केली. रक्ताने माकलेल्या अवस्थेत मी घरी गेले.
मात्र, यानंतर, पेज पोलिसांसमोर पुराव्यानिशी गेली. त्यानंतर पोलिसांनी डॅक्लेनला अटक केली. पेज म्हणाली की, या हल्ल्यानंतर तिचा चेहरा खराब झाला आहे आणि तिला प्रियकराशी प्रेम होते. मात्र, असे कृत्य केल्याने मी त्याला कधीही माफ करणार नाही.