नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विमानतळावर ३० लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी एका महिला आरोपीला अटक केली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रामधून ३० लाख रुपयांचे सोने आणणाऱ्या एका महिलेला कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. ही महिला मॉस्कोहून आली असल्याची माहिती मिळाली आहे. ब्रामधील इलास्टिक असलेल्या जागेवर या महिलेने सोन्याच्या चार तारा बसवल्या होत्या.
यासोबतच तिच्या इतर कपड्यांमध्ये सोन्याची ४ बिस्किटं देखील होती. दिल्ली विमानतळावर ग्रीन चॅनल पार केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना या महिलेचा संशय आला होता, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची तपासणी केली असता, हा प्रकार उघड झाला.
ब्राची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना ब्राच्या आत सोन्याच्या ४ तारा तसेच इतर कपड्यांमध्ये सोन्याची ६ बिस्किटेही लपवलेली आढळली. एकूण सोन्याचे वजन ७९४ ग्राम भरले.पुढील कारवाई करत कस्टम अधिकाऱ्यांनी कस्टम कायद्याच्या कलम ११० अंतर्गत सोने जप्त केले.
Visit : bahujannama.com