बहुजननामा ऑनलाईन टीम : मध्य प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेतील धांधलीचे प्रकरण समोर आले आहे. ग्वाल्हेरमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे चुकीचे वाटप केल्याच्या आरोपाखाली एका महिलेने एका सरकारी अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केली आहे. वास्तविक प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे वाटप चुकीच्या पद्धतीने केल्याने महिला आणि त्या अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर एका महिलेने चप्पल काढून एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात एका महिलेने अधिकाऱ्यावर चुकीचे वाटप केल्याचा आरोप करूत त्याच्यावर तुटून पडते. हातात चप्पल घेऊन ही महिला अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे.
जेव्हा एखादा माणूस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्त्री त्याच्यावर देखील हल्ला करण्यास सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये मी देखील फॉर्म भरला आहे, असे आवाज येत आहेत. दरम्यान ही घटना घडली तेव्हा तेथे बरेच लोक उपस्थित होते.
#WATCH Madhya Pradesh: A woman thrashes a govt official with a slipper as a group of women engages in a verbal spat with him over alleged wrongful allocations of houses under Pradhan Mantri Awas Yojana, in Gwalior. The women alleged that houses have been wrongly allocated.(03.10) pic.twitter.com/5AEKR9eHUz
— ANI (@ANI) October 3, 2019
Visit : bahujannama.com