नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने घरे बांधण्यासाठी कर्ज घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देत त्यांचे व्याज दर ८. ५ टक्क्यांवरून ७.९ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन व्याज दर १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांचा नवीन व्याज दर एका वर्षासाठी कमी करण्यात आला आहे, तसेच घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादादेखील नसणार आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की, या कर्जाचे व्याजदर कमी केले जातील जेणेकरून अधिकाधिक सरकारी कर्मचारी घरे बांधण्यास प्रवृत्त होतील.
Visit : bahujannama.com