Will Ashok Chavan Join BJP? | अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – Will Ashok Chavan Join BJP | माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचे स्वागत करू, असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (BJP MP Pratap Patil Chikhalikar) यांनी केले आहे. हे वक्तव्य करताना चिखलीकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. दरम्यान, चिखलीकर यांच्या या वक्तव्यावमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Will Ashok Chavan Join BJP)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र, काँग्रेस पक्षात फूट पाडण्यात भाजपाला अद्याप यश आलेले नाही. मात्र, आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Will Ashok Chavan Join BJP)
याबाबत भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे १०० वॉरियर्सच्या बैठकीसाठी नांदेडला आले होते. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक रांगेत आहेत. त्यामध्ये त्यांनी नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केला.
प्रताप पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की, अशोक चव्हाणांसाठी हे नवीन नाही. ते सत्तेसाठी भाजपात येऊ शकतात. ते इकडे आले तर त्यांचे भारतीय जनता पार्टीकडून स्वागत आहे.
- Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार
- Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला, दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक
- Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार
- Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…
- Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.
Comments are closed.