नवी दिल्ली : डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) चे जनरल डायरेक्टर टेड्रस अधनोम कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी रविवारी माहिती देताना म्हटले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांमध्ये त्यांची ओळख पटली आहे. मात्र, त्यांनी हे सुद्धा सांगितले की, त्यांना अजूनपर्यंत शरीरात कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवली नाहीत.
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी ट्विटमध्ये लिहिले, मी एखाद्या अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे, जो कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे. मी ठिक आहे. कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु प्रोटोकॉलनुसारत काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाइन राहीन आणि वर्क फ्रॉम होम करेन.
त्यांनी जोर देऊन म्हटले की, महामारी दरम्यान आरोग्यासंबंधी दिशा-निर्देशांचे पालन करणे महत्वपूर्ण आहे, जेणेकरून आजाराचा ट्रान्समिशन रेट कमी होईल आणि हेल्थ केयर सिस्टमवर याचा कमीतकमी दबाव असावा. कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला किमान 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहावे लागते.
टेड्रस अधनोम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले, हे महत्वपूर्ण आहे की, आपण सर्वांनी हेल्थ गाइडलाइंसचे पालन करावे. अशाप्रकारे आपण कोविड-19 ट्रान्समिशनची चेन तोडू शकतो. व्हायरस रोखू आणि हेल्थ केयर सिस्टमचे रक्षण करू. मी आणि माझे सहकारी जीव वाचवणे आणि कमजोर लोकांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने काम करणे सुरूच ठेवू.
सध्या संपूर्ण जगात साडेचार कोटीपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. या जीवघेण्या महामारीने आतापर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेतच कोरोना संक्रमितांची संख्या एक कोटीच्या पुढे पोहचणार आहे.