नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलवरून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनफॉलो करण्यात आल्यानंतर भारतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. अचानक अनफॉलो करण्याचा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भात व्हाइट हाऊनसने भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाउस’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, त्यानंतर अचानक काल (दि.29) व्हाइट हाउसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले होते. त्यानंतर आता अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हाइट हाऊसचे ट्विटर हँडल अमेरिकने सरकारच्या इतर ट्विटर हँडलचे अनुकरण करते आणि त्यानुसारच काम केले जाते. उदारणार्थ राष्ट्रध्यक्षांचा एखाद्या देशात दौरा असेल, तर त्या दौर्यापूर्वी यजमान देशातील महत्त्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केले जाते.
कारण दौर्याविषयीचे यजमान देशाच्या अधिकृत ट्विटर हँडल करण्यात आलेले ट्विट रिट्विट केले जातात. त्यानंतर पुन्हा अनफॉलो केले जाते. केवळ दौर्यादरम्यान मर्यादित कालावधीसाठी असे केले जात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीतील नियोजित भारत दौर्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाचे ट्विटर हँडल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांचं ट्विटर हँडल फॉलो केले होते.