बहुजननामा ऑनलाईन टीम : जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल ऑफलाईन असाल तरीही आता Whatsapp हे मेसेजिंग अॅप वापरता येणार आहे.
Whatsapp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणते. व्हॉट्सअॅपवर समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यावर आपण ऑनलाईन आहोत की ऑफलाईन याची माहिती मिळत असते. तसेच लास्ट सीनच्या माध्यमातून याअगोदर किती वाजता समोरची व्यक्ती अथवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी ऑनलाईन होते, हेही समजत होते. मात्र,काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत, ते इतरांना समजायला नको, असं वाटतं असतं. अशा मंडळींसाठी आता एक Whatsapp कडून खूशखबर आहे. कारण, व्हॉट्सअॅपवर आता ऑफलाईन राहून चॅटिंगची मजा घेता येणार आहे.
तसेच तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणाला कळणार देखील नाही. रात्री उशीरापर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल तर, अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. अनेकदा समोरची मंडळी ऑनलाईन आहे हे पाहून विनाकारण काही लोक मेसेज करतात. त्यांना रिप्लाय देणं काहीवेळा अवघड असतं. अशावेळी अशापद्धतीने ऑफलाईन राहून चॅटिंग करता येणार आहे.
आता ऑफलाईन राहून चॅटिंग कसं ते जाणून घेऊया.
– गुगल प्ले स्टोरवरून WA bubble for chat हे अॅप डाऊनलोड करा.
– त्यानंतर अॅप अनेक अॅक्सेसिबिलिटी परमिनशन्स मागेल, त्यावर तुम्हाला allow करा.
– व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजेस तुम्हाल बबल्समध्ये येतील.
– या चॅटिंगमध्ये तुम्ही कोणालाही ऑनलाईन दिसणार नाही. तसेच ऑफलाईन राहून सहज चॅटिंग करू शकता.
– यासोबतच यात कोणालाही तुमचा लास्ट सीन दिसणार नाही.
WhatsApp OTP Scam म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या
WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. तसेच ते अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, सध्या हे हॅकर्सच्या निशाण्यावर आहे, अशी माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत. सध्या एका नव्या प्रकारचा स्कॅम हा व्हॉट्सअॅपवर सुरू केला आहे. ज्याच्या मदतीने एखादा मित्रचं आपलं अकाऊंट हॅक करू शकतो. म्हणून व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅममध्ये स्कॅमर सर्वप्रथम युजर्सना त्याच्याच एका मित्राच्या नावाने मेसेज पाठवला जातो. तसेच तुमचा मित्र अडचणीत आहे, असे त्यात सांगितलं जातं. अनेकदा हॅकर्स मित्रांच्या नंबरवरून मेसेज करतात.
हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मेसेजला रिप्लाय केल्यास हॅकर्सकडून आणखी एक मेसेज पाठवतो. त्यानंतर ओटीपी विचारला जाईल. चुकून हा मेसेज तुम्हाला पाठवला, असे सांगून हॅकर तोच मेसेच पुन्हा त्याला फॉरवर्ड करायला सांगतो. मात्र, यामागचं खरं कारण म्हणजे हे मुद्दाम ओटीपीच्या माध्यमातून युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी केलं आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं आवश्यक आहे.
ओटीपी सांगितल्यास तुमच्या नंबरच्या मदतीने हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होईल, कारण व्हॉट्सअॅप नव्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी एका ओटीपीची आवश्यकता असते. तो हॅकरने युजर्सकडून मागितलेला असतो. याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे मागू शकतात.