बहुजननामा ऑनलाइन टीम – व्हॉट्सअॅपने अलीकडेच प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. त्यानंतर कंपनी वादात आहे. लोक प्रायव्हसी फोकस मॅसेजिंग अॅप सिग्नल आणि टेलिग्रामकडे शिफ्ट होत आहेत. यादरम्यान, व्हॉट्सअॅपचे (WhatsApp)स्पष्टीकरण आले आहे. नवीन पॉलिसीचा सामान्य वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, बिजनेस अकाउंट वापरकर्त्यांवर याचा अधिक परिणाम होईल. व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीमध्ये बिझिनेस अकाऊंटबाबत काय आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. कारण आपण व्हॉट्सअॅप बिझिनेस वापरत नसाल, परंतु आपण एखादा प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी व्यापार्याच्या व्हॉट्सअॅप बिझिनेस अकाउंटवर मेसेज केल्यास व्हॉट्सअॅप आपल्यावर लक्ष ठेवू शकेल. व्हॉट्सअॅपने आज आपले FAQ पेज अपडेट केले आहे. या पेजवर कंपनीने म्हटले की, दररोज जगभरातील लाखो लोक व्हॉट्सअॅपवर आपल्या ग्राहकांशी बोलतात. व्हॉट्सअॅप बिझिनेसमुळे हे सुलभ होते असे कंपनीने म्हटले आहे. बिजनेस कम्युनिकेशन वापराबद्दल, फेसबुकने म्हटले की, ते प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमीच स्पष्ट असेल.
काय आहे फेसबुक होस्टिंग सेवा?
कंपनीच्या मते, बिजनेस चॅटिंग मित्र किंवा कुटूंबाशी चॅटिंग करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. काही मोठ्या व्यवसायांना त्यांचे कम्युनिकेशन मॅनेज करण्यासाठी होस्टिंग सेवांची आवश्यकता असते. व्हॉट्सअॅपवर चॅट मॅनेज करण्यासाठी, ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फेसबुक होस्टिंगची सुरुवात झाली आहे. ज्यासह सहजपणे पावती पाठविणे, ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, अशी कामे केली जाऊ शकतात.
बिजनेस कम्युनिशनवर व्हॉट्सअॅपची नजर
कंपनीने स्पष्ट केले आहे कि, बिजनेस कम्युनिकेशन फोन, ईमेल किंवा व्हॉट्सअॅपवरुन झाल्यावर त्यांची नजर असेल . जे ते त्यांच्या मार्केटिंगसाठी वापरू शकतात. याशिवाय फेसबुक जाहिरातीसाठीही याचा वापर करता येईल. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी त्या चॅटला लेबल करेल. जी फेसबुकच्या होस्टिंग सर्विसचा वापर करेल.
नवीन कॉमर्स फिचर
लोक ऑनलाइन शॉपिंगच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. फेसबुकच्या ब्रँडेड कॉमर्स फीचरच्या मदतीने लोक दुकानात ग्राहकांना आपला माल दाखवू शकतील. या वैशिष्ट्यासह लोक व्हॉट्सअॅपवरच लोकांना वस्तू दाखवू शकतात. ज्याद्वारे लोकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालाची माहिती मिळू शकेल. आपण दुकानात संवाद साधत असल्यास आपल्या शॉपिंग अॅक्टिव्हिटीचा वापर केला जाईल. जो आपला खरेदी अनुभव सुधारण्यासाठी वापरला जाईल. याचा वापर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिराती दाखवण्यासाठीही केला जाईल. ही सेवा पर्यायी आहे. हे वैशिष्ट्य वापरुन अॅपमध्ये सांगितले जाईल कि, वापरकर्त्याचा डेटा फेसबुकसह कसा सामायिक केला जात आहे .
फेसबुकवरील जाहिरातींसह, message a business using WhatsApp चे बटन पाहू शकता. व्हॉट्सअॅप आधीपासूनच तुमच्या फोनमध्ये स्थापित केलेला असेल तर तुम्ही त्या व्यवसायाला थेट संदेश पाठवू शकता. या फेसबुक जाहिरातींशी आपण कसा संवाद साधता. हा डेटा वापरुन, फेसबुक पुढच्या वेळेपासून आपल्याला अशा प्रकारच्या जाहिराती दर्शवेल. एकंदरीत व्हॉट्सअॅपच्या या पॉलिसीवर ज्यामुळे वाद ओढवला होता, ते होत नाही. कारण कंपनी आता थेट व्यवसाय टार्गेट करीत आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य वापरकर्त्यांची खरेदी व वागणूकही ट्रॅक करेल.