• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केलीये का ?’

by sajda
January 3, 2021
in राजकारण
0
ministry

ministry

बहुजननामा ऑनलाइन टीम – नव वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. मात्र, त्यानंतर तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?,” असं म्हणत भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

हा आहे निर्णय
यावर्षी फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. त्यामुळे गट-अ ते गट-क च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशिरा उपस्थिती ही दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी असल्याने त्यांचे बाबतीत उशिरा उपस्थिती ही सकाळी ११.०० वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशिरा येतील, त्यांची उशिरा उपस्थिती न मांडता खातरजमा करून ती माफ करावी, असेही या आदेशात म्हटलं आहे.

रजेची सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशिरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशिरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी. पररिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशिरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येऊ नये, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग, कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी एका महिन्यात दोन वेळा जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल. त्यानंतरच्या तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी एक नैमित्तिक रजा वजा करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. शिवाय, एकाच महिन्यातील तीनपेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थितीसाठी म्हणजेच सहाव्या, नवव्या, आदीसाठी प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करावी. नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर अर्जित रजा वजा करावी. ज्यांची अर्जित रजा शिल्लक नसेल, त्यांची असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करावी.

Tags: Ministryट्विटरभाजपामंत्रालय
Previous Post

‘ह्या’ बातम्या चुकीच्या आहेत, रस्त्यावर उतरायचे तेंव्हा उतरू : खा. संजय राऊत

Next Post

महिलांवरील होणारे अत्याचार व शोषण पाहता सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाने पुन्हा सुरू केले पाहिजे : डॉ.नीलमताई गोर्‍हे

Next Post
Society

महिलांवरील होणारे अत्याचार व शोषण पाहता सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाने पुन्हा सुरू केले पाहिजे : डॉ.नीलमताई गोर्‍हे

Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ministry
राजकारण

‘मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केलीये का ?’

January 3, 2021
0

...

Read more

Explainer : तुमची वैयक्तिक माहिती WhatApp, Signal का Telegram वर सुरक्षित ?, जाणून घ्या

5 days ago

TATA ची ‘ही’ कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला

7 hours ago

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडया आणि क्रृणाल पांडया यांच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळं निधन

4 days ago

काळजी घ्या ! आता वेगळयाच क्रमानं दिसताहेत कोरोनाची लक्षणे, आधी ताप अन् मग सुरू होते अंगदुखी, जाणून घ्या

5 days ago

Pune News : ‘त्या’ प्रकरणात चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’

1 day ago

Mumbai News : काकोळी ग्रामपंचायत निकाल ! शिवसेनेसह भाजपालाही धक्का; मनसेच्या पॅनेलने मारली बाजी..

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat