बहुजननामा ऑनलाइन टीम – आयटी कंपन्यांमुळे हिंजवडी हा औद्योगिक परिसर म्हणून जगप्रसिद्ध झाला आहे. या ठिकाणी पूर्वी शेती होती. पण आता काही भागातच शेती राहिली आहे. अशाच एका शेतजमिनीत पोलिसांनी चक्क ६ फुट उंच वाढलेले गांजाचे झाड आढळून आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित कुटे यांनी याबाबत हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यानुसार शेकर गोपाळ गुंजाळ (वय ५५, रा. इशदान सोसायटी, पौड रोड, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माण हिंजवडी रस्त्यावरील जोशी वडेवाले समोरील सुरेश बोडके यांचे मालकीचे सर्व्हे नं. ४३१ व शेखर गुंजाळ यांच्या ताबे बहिवाटीतील शेजमिनीमध्ये एक ६ फुटे ३ इंच उंचीचे ७० हजार २५० रुपये किंमतीचे २ किलो ८१० ग्रॅम वजनाचे गांजाचे झाड बेकायदेशीरपणे लावलेले आढळून आले आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे झाड लावल्याने गुन्हा दाखल करुन शेखर गुंजाळ याला अटक केली आहे.