बहुजननामा ऑनलाइन टीम – एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 34 वर्षीय सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली आणि तिनं त्याला तिच्याच आईच्या आणि बहिणीच्या हत्येत साथ दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये ही घटना घडली आहे. सदर अल्पवयीनं मुलीनं पोलिसांना सांगितलं की, ती आईचा राग करत होती. परंतु आईला आणि बहिणीला तिनं मारलं नाही असं ती म्हणाली आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, जेव्हा आरोपीच्या घरामागील जमीन खोदली गेली तेव्हा तिथं आरोपीच्या पत्नीचा आणि 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर 16 वर्षीय मुलीला आणि तिच्या सावत्र वडिलांना ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या 34 वर्षीय सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली होती. आरोपीनं अनेकदा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे. ही मुलगी तिच्या आईचा राग करत होती. त्यामुळं तिनं आईच्या आणि बहिणीच्या हत्येत सावत्र वडिलांना साथ दिली. फॅब्रिसियो एरिना असं या सावत्र वडिलांचं नाव आहे. 16 वर्षीय मुलीचं म्हणणं आहे की, तिनं आई आणि बहिणीला मारलं नाही.
फॅब्रिसियो यानं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये भांडणादरम्यान त्यानं पत्नीची हत्या केल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर एका महिन्यानंतर त्यानं 9 वर्षीय मुलीचीही हत्या केली. कारण ती सतत आईबद्दल विचारत असे ज्यामुळं तो संतापला होता.