नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होत आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांसह इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांनी दोन वेळा सभा पुढे ढकलली. त्यामुळे भाजप खासदाराने त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
अमित शाह यांची बांकुरा जिल्ह्यात जाहीर सभा होणार होती. मात्र, त्यांनी ही सभा दोन वेळा पुढे ढकलली. सभेची वेळही बदलली होती. त्यावरून आता सुब्रमण्यम् स्वामी यांनी अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यामध्ये ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील अमित शाह यांच्या पूर्वनियोजित ऐतिहासिक जाहीर सभेचे प्रक्षेपण पाहण्यासाठी टीव्ही लावला. मात्र, सभा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर टीव्हीवर त्याबाबत कोणतीही अपडेट दिली गेली नाही. याचे कारण कळेल?’ असा सवाल त्यांनी केला.
I tuned into TV Channels for a pre announced Amit Shah’s historic address in a Bengal rural area. But after two postponements on the scheduled time the Channels went silent on the broadcast. Any reason?
— Subramanian Swamy (@Swamy39) March 15, 2021
दरम्यान, सभेच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या अमित शाह यांनी उपस्थित जनतेची माफी मागितली. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे येण्यास उशीर येण्याचे कारण दिले. या सर्व गोष्टींना मी षडयंत्र म्हणणार नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांना लगावला.