बहुजननामा ऑनलाईन – जिओने नवीन प्लॅन आणल्यापासून टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु झाली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्यांनी रोज नव नवीन आणि स्वस्तातील प्लॅन लॉन्च करत आहेत. अशाच पद्धतीचा स्वस्त आणि मस्त प्लॅन सध्या वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. यामध्ये ग्राहकांना केवळ ५९ रुपयांमध्ये १ जीबी डाटा मिळणार आहे. वोडाफोनच्या या प्लॅनमुळे जिओच्या ५२ रुपयांच्या प्लॅनला टक्कर मिळणार आहे.
५९ रुपयांचा वोडाफोनचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकाला दिवसाला १ जीबी डाटा मिळतो आणि त्याची वैधता ही ७ दिवस असणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण ७ जीबीचा डाटा उपलब्ध होणार आहे. मात्र या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही. याआधीही वोडाफोनने एक फिल्मी प्लॅन लॉन्च केला होता. ज्याची किंमत केवळ १६ रुपये होती. यामध्ये एका दिवसासाठी १ जीबी डेटा मिळत होता.
५२ रुपयांचा जिओचा प्लॅन
जिओच्या ५२रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १५० एमबी डेटा प्रतिदिवस आणि त्याबरोबर अनलिमिटेड कॉल आणि एसएमएसची सेवा मिळत असे. या प्लॅनची अवधीही ७ दिवसांची आहे.
दोन प्लॅनमधील फरक
जर दोन्ही कंपनीच्या प्लॅनमधील फरक पाहिला तर जिओपेक्षा वोडाफोन हे जास्त इंटरनेट डाटा देतो. जिओच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि मेसेज आहे ते वोडाफोनमध्ये नाही. जर तुम्हाला कॉल पेक्षा डाटाची गरज जास्त असेल तर तुमच्यासाठी वोडाफोनचा प्लॅन योग्य ठरेल.