बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अॅक्टर सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या नावाची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धार्थचं नाव तसं तर आलिया भट आणि तारा सुतारिया यांच्यासह अनेकांसोबत जोडलं (Siddharth Malhotra-Kiara Advani)गेलं आहे. सध्या पुन्हा एकदा सिदार्थ आणि कियाराच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कियारा नेहमी सांगत असते की, ती रिलेशनशिपमध्ये नाहीये. सिर्द्धार्थही स्वत:ला सिंगल असल्याचं सांगत असतो. अद्याप दोघांनीही यावर खुलून भाष्य केलेलं नाही. पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि कियारा मुंबईच्या रेस्टॉरंट बाहेर स्पॉट झाले आहेत. दोघं लंच करण्यासाठी आले होते.
सिद्धार्थ आणि कियारा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दोघं रेस्टॉरंट समोर कारमधून उतरताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर कियारा क्रॉप टॉप आणि फ्लेयर पँटमध्ये दिसली. तिनं मास्कही परिधान केलं होतं. सिद्धार्थ ट्राऊजर आणि व्हाईट टीशर्टमध्ये दिसून आला. तो दुसऱ्या कारमधून रेस्टॉरंटमध्ये आला होता.
सिद्धार्थ आणि कियाराचा वेगवेगळ्या गाडीतून आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांनी मालदीवमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट केलं होतं. दोघांनी अद्याप त्यांचं नातं पब्लिक केलेलं नाही. त्यामुळं त्यांनी आपापल्या इंस्टावरून फोटो शेअर केले होते.
कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. नुकतीच ती इंदू की जवानी मध्ये झळकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. आता ती भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जियो हा सनेमाही आहे.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मरजावां सिनेमानंतर आता तो शेरशाह सिनेमात दिसणार आहे. शेरशाह या सिनेमात सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमात सिद्धार्थ शहिद आणि परमवीर चक्रानं सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या रोलमध्ये दिसणार आहे. कियारा त्यांची विक्रम यांची होणारी पत्नी डिंपल चीमा यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह आणि अजय देवगण स्टारर इंद्र कुमार या कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे.