नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका माथेफिरू प्रियकराने दिवसा ढवळ्या आपल्या प्रियेसीच्या घरी जाऊन चक्क गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या गोळीबाराचे सिसिटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओत तरुणाकडून गोळीबाराची घटना स्पष्ट दिसत आहे. या घटनेबाबत पोलीस तपास करीत असून प्रेम प्रकरणातूनच ही फायरिंग झाल्याचे बोलले जात आहे.मात्र अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही. गोळी झाडणाऱ्या तरुणाला अद्याप पकडण्यात आले नाही.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राठ कोतवाली भागातील खुशीपूर येथे राहणारे शिवकुमार सोनी यांच्या परिवारावर या भागात राहणाऱ्या अतुल सोनी याने दिवस उजेडात फायरिंग केली. ज्यावेळी हा हल्ला केला तेव्हा शिवकुमार सोनींची आई सावित्री सोनी आपल्या नातीसोबत घरातील दुकानावर बसली होती. शिवकुमार सोनीने सांगितले की, त्यादरम्यान पठानपुरा गंज मोहल्लाचा निवासी अतुल सोनी बाईकवरुन आला. दुकानासमोर बाईक उभी केली. आणि आई व मुलीवर गोळी झाडली. गोळी दुकानाच्या आतील दरवाज्याला भेदून गेली. सुदैवाने या कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. सीसीटीव्हीतील दृश्यावरुन पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहे. या व्हिडिओमध्ये मारेकरी बाईकवरुन प्रियसीच्या घराजवळ येऊन थांबल्याचे दिसत आहे. गोळ्या घातल्यानंतर तो तेथून पसार झाला.