बहुजननामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर काहींनी टीकाही केली आहे. कंगनानंही तिच्यावर निशाणा साधला होता. पंजाबी सिंगर आणि बॉलिवूड अॅक्टर दिलजीत दोसांझ रिहानाच्या सपोर्टमध्ये पुढं आला. त्यानं रिहानाला डेडीकेट करत एक गाणंच रिलीज केलं आहे. गाण्याचं टायटल आहे RiRi (Rihanna). दिलजीत दोसांझनं हे गाणं गायलं आहे आणि राज रंजोधनं हे गाणं लिहिलं आहे.
https://twitter.com/diljitdosanjh/status/1356873492587716609?s=20
यापूर्वी बाबा सहगलनं डेडिट केलं होतं साँग
ही पहिली वेळी नाही की, कुण्या इंडियन सिंगरनं रिहानासाठी गाणं डेडिकेट केलं आहे. याआधीही रॅपर बाबा सहगलनं रिहानासाठी गाणं डेडिकेट केलं आहे. 2016 मध्ये बाबा सहगलचं हे गाणं रिलीज झालं होतं. रिहाना ओ रिहाना असं या गाण्याचं नाव होतं.
दिलजीतच्या गाण्यावर कंगनानं दिली प्रतिक्रिया
कंगनानंही दिलजीतच्या गाण्यावर प्रतिक्रिया देत लिहिलं की, यालाही याचे 2 रुपये कमवायचे आहेत. हे सर्व कधीपासून प्लॅन होत आहे. व्हिडीओची तयारी आणि अनाऊंसमेंटसाठी किमान एक महिना तर लागेल. लिब्रूंना वाटतं की, आम्ही विश्वास ठेवावा की, हे सर्व ऑर्गेनिक आहे.