बहुजननामा ऑनलाईन टीम – Vicky Donor 2 | अभिनेता आयुष्मान खुरानाची बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. त्याने आतापर्यंत अनेक वेगळ्या विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो आपल्या प्रत्येक चित्रपटातून लोकांना काहींना काही संदेश देत असतो. त्याने नुकताच त्याचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘विकी डोनर.’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Vicky Donor 2)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2012 साली आयुष्मान खुरानाचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात आयुष्मानने एका स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दूसरा भाग प्रदर्शित व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता आयुष्मान खुरानाने या विषयावर भाष्य करत एक मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाला आयुष्मान खुराना?
विकी डोनर 2’ (Vicky Donor 2) बनवायचा आहे, पण आत्ता नाही. मी हा चित्रपट आणखी 10 वर्षांनी बनवेन. म्हणजे तोपर्यंत विकीची सगळी मुलं मोठी झाली असतील आणि तो त्या मुलांकडे नीट लक्ष देऊ शकेल.” त्याच्या या उत्तराने सगळ्यांना हसू फुटले. त्यामुळे आता आयुष्मान खुरानाचे चाहते आतापासूनच या चित्रपटाची वाट बघत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Vicky Donor 2 | aayushman khuranna expressed his thoughts about sequel of vicky doner film
हे देखील वाचा :
Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड