बहुजननामा ऑनलाईन टीम : Ishan Kishan Double Century | इशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये झंझावाती खेळी करत दुहेरी शतक ठोकलं आहे. त्याने आपल्या खेळीत बांगलादेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी चेंडूत द्विशतक करण्याचा विक्रम त्याने केला आहे. इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक (Ishan Kishan Double Century) साजरे केलं आहे. याअगोदर कमी चेंडूत द्विशतक करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. इशान किशन आजच्या सामन्यात 210 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 षटकार लगावले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा ठरला दुसरा युवा भारतीय
किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. त्याने हे अर्धशतक 24 वर्षे आणि 145 दिवसांच्या वयात ठोकले. यासह त्याने या यादीत दुसरे स्थान गाठले. या यादीत अव्वलस्थानी गौतम गंभीर असून त्याने 21 वर्षे आणि184 दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसेच, या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग असून त्याने 24 वर्षे आणि 173 दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक केले होते.
https://twitter.com/BCCI/status/1601497945693904899
गेलचा विक्रम मोडला
सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम याआधी ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने 138 चेंडूत झिम्बॉब्वेविरुद्ध द्विशतक केलं होते. मात्र, आता इशान किशनने तो विक्रम मोडत 126 चेंडूत द्विशतक केले. यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा नंबर लागतो.
भारताकडून द्विशतक झळकवलेले खेळाडू
सचिन तेंडुलकर – 200
वीरेंद्र सेहवाग – 219
रोहित शर्मा – 264. 209 आणि 208
इशान किशन- 210
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ishan Kishan Double Century | ishan kishan double century fastest record ind vs ban
हे देखील वाचा :
Vicky Donor 2 | ‘विकी डोनर 2’बद्दल आयुष्मान खुरानाने केला मोठा खुलासा, म्हणाला…