बहुजननामा ऑनलाईन – घरात लावलेल्या पेंटींग्स या घराच्या ऊर्जेला नियंत्रित करतात. पूर्व दिशेला सुर्योदय होतो या दिशेला उगवणारा सुर्य, सुर्यवंशी भगवान रामाचा दरबार, सूर्या नमस्कार करताना चित्र किंवा निसर्गाशी संबंधित एखाद्या फोटो पैकी कोणताही एक लावल्यानं घराच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होते. यामुळं घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं.
1) लावा हिरव्यागार झाडांचा फोटो – घरात उत्तर किंवा पूर्वेच्या भिंतींवर धबधबे, फळं, फूल किंवा हिरव्यागार वृक्षाचे फोटो लावल्यानं कुटुंबातील लोकांच्या आयुष्यात आर्थिक प्रगती होते. यामुळं आनंदात वाढ होते.
— TimePass (@TimePassTalks) August 26, 2020
2) उत्तर दिशेत कुबेराचा वास – उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हटलं आहे. म्हणून धनाची वृद्धी होण्यासाठी या दिशेला धनाची देवी लक्ष्मी, भगवान गणेश, रत्न किंवा आभूषणांचे फोटो लावले जाऊ शकतात.
— TimePass (@TimePassTalks) August 26, 2020
3) पर्वातांच्या फोटोंमुळं वाढतं मनोबल – पर्वतांचे फोटो दक्षिण किवा पश्चिम दिशांच्या भिंतीवर लावल्यानं मनोबल वाढतं.
— TimePass (@TimePassTalks) August 26, 2020
4) फॅमिली फोटोही गरजेचा – घराची उत्तर दिशा, पूर्व दिशा आणि उत्तर-पूर्व दिशेत फॅमिली फोटो लावायला हवा. यामुळं घरातील सदस्यांचे मतभेद दूर होतात आणि त्यांच्यात प्रेम कायम राहतं.
— TimePass (@TimePassTalks) August 26, 2020
5) यानंही वाढतो अभ्यासातील रस – मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत पूर्व दिशेला विद्येची देवी सरस्वती मातेचा फोटो लावायला हवा. या दिशेला तोंड करून अभ्यास केल्यानं अभ्यासात रस निर्माण होतो.
— TimePass (@TimePassTalks) August 26, 2020
6) फोटोंमुळं दूर होतो वास्तु दोष – जर तुमची इच्छा असेल तर मोर, वीणा, लेखणी, पुस्तक आणि हंस या फोटोंपैकी कोणताही एक फोटो लावू शकता.