पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने राजर्षि शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.शाहू कॉलेज येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष अतुल बहुले, जिल्हाध्यक्ष पश्चिम विभागीय उत्तम वनंशिव, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिताताई चव्हाण, नवनीत अहिरे, वैशाली गायकवाड, अंबादास ओव्हाळ, संदीप चौधरी, मुस्तफा शेख, रवींद्र गायकवाड, सागर कांबळे, रेखाताई चौरे, निरंजनाताई सोनवणे, भिमराव चव्हाण, अमोल काटे, रवीभाऊ वनंशिव रोहन गायकवाड, विशाल गायकवाड, रागीणी कांबळे, विनोद शेंडगे, प्रतिक बहुले, मेजर अनिल सोनवणे, पप्पू वाघमारे, रत्नदीप साळवे व राजु गायकवाड आदी पदाधिकारी शाहु कॉलेज सहकार नगर पर्वती पुणे येथे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.