मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नेहमीच आपल्या अनोख्या अंदाजामुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये पुन्हा आपल्या वेशभुषेमुळे चर्चेत आले आहेत. आज त्यांनी भोपाळमधून निवडून आलेल्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी शहिद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पोलिसांचा वेश करून विधानसभेत एन्ट्री केली. त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांनी अडविल्याने तणाव निर्माण झाला होता.
प्रकाश गजभिये यांनी विधानसभेत आज शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा वेश करून प्रवेश केला. त्यावेळी त्यांना तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनीही अडविले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मी प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो, ही अंधश्रद्धा आहे. मी देशासाठी शहिद झालो. अशा आशयाची पाटी त्यांच्या हातात होती.
कोण आहेत प्रकाश गजभिये ?
प्रकाश गजभिये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. ते नागपूर येथे राहण्यास आहेत. नागपूर महापालिकेतही त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भुमीका बजावली आहे. तसेच नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर ते सदस्य होते.
नेहमीच वेशभुषेमुळे चर्चेत
प्रकाश गजभिये नेहमीच आगळी वेगळी वेशभुषा करत आंदोलन करण्याने सतत चर्चेत असतात. त्यांनी यापुर्वीबी वेगवेगळ्या वेशभुषा करत आंदोलन केले होते. मागील अधिवेशनात त्यांनी शिवाजी महाराजांची वेशभुषा करत आंदोलन केले होते. त्यावेळी बेमुर्वतखोर सत्ताधाऱ्यांनो चालते व्हा, असा संदेश देत त्यांन आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफी या विषयांकडे लक्ष वेधले होते. तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या आंबा खाल्ल्याने मुलं होतात. या विधानाचा निषेध करत भिडेंची वेशभुषा करून विधानसभेत दाखल झाले होते. आंब्यांची टोपलीच हातात घेऊन त्यांनी प्रवेश केला होता.